हिंगोली पोलीस दलात ठाणे दाराचे खांदेपालट पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांचे आदेश....!
हिंगोली/-
जिल्हा पोलिस अस्थापना मंडळाच्या शिफारसी नुसार प्रशासकीय निकडी नुसार तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न अबाधित राखण्यासाठी प्रशासकीय कारणा वरून जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी एकूण तेरा पैकी सात ठाणेदारच्या बदल्या तडकाफडकी केल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशन पैकी 7 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या औंढा नागनाथ येथून पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विद्यासागर सिरमनवार पोलिस कल्याण हिंगोली यांची बासंबा येथे बदली करण्यात आली आहे. विश्वनाथ किसनराव झुंजारे हिंगोली नियंत्रण कक्षातून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आले आहे. बासंबा ठाण्याचे ठाणेदार राजेश मलपिल्लू यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. कुंरूदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गोपनिवार यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गजानन मोरे यांची पोलिस स्टेशन कुंरूदा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयेंद्र सरोदे यांची दहशतवादी विरोधी सेल यांची नियुक्ती हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी अधिकाराचा वापर करून प्रशासकीय बदल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणेदार यांच्या बदल्या तात्पुरती स्वरूपात केल्या आहेत. यामध्ये काही पोलीस अधिकारी . यांच्या बदल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून काही खूषी तर काही ठिकाणी गम आहे. दिसून येत आहे
إرسال تعليق