अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन
हिंगोली- इस्लामपूर येथील सभेमध्ये पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण समाजाच्या चालिरीती, मंत्रोच्चार आदी बाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावत, सामाजीक द्वेष पसरवल्या बद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपरोक्त सभेत पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण समाजाच्या चालिरीती व परंपरेबाबत राज्य शासनाचे जबाबदार मंत्र्या समोर अपशब्द वापस्न, टिंगल-टवाळी केली व त्यास हसुन त्यांनी सुध्दा खिल्ली उडवली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सर्व समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे.सदर व्यक्ती हा राज्याचा जबाबदार आमदार असून त्यांनी हिंदू समाजात पौराहित्य करणाऱ्या बाबत व विवाह परंपरेबाबत स्वतःला कोणतेही ज्ञान नसताना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे व जातीयतेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतून अमानवीय असून याचा आम्ही समस्त ब्राम्हण बांधव जाहीर निषेध करतो. सदरील आ. अमोल मिटकरीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निंदनीय घटने बाबत समाजाची जाहीर माफी मागावी व अमोल मिटकरी यांना बडतर्फ करावे अशी निवेदनाद्वारे हिंगोली शहरातील ब्राह्मण समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच शासन दरबारी याची दखल घेऊन अशा प्रकारे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
إرسال تعليق