पोलिस उपअधीक्षक यांच्यासह गोरेगाव पोलिस ठाण्याच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
हिंगोली : जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत दोन खुनाच्या घटना मध्यंतरी घडल्या होत्या . यासाठी नेमलेल्या पोलिस उपअधीक्षक यांच्यासह गोरेगाव पोलिस ठाण्याच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तत्काळ सदरील घटना उघडकीस आणल्या . याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी या पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सोमवारी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत सहा एप्रिल रोजी दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या . ज्यामध्ये गुगुळ पिंपरी येथे अमोल इंगोले याचा खून झाला होता . तसेच गोरेगाव येथे राजस्थान येथील रहिवासी असलेला ज्यूस दुकान चालक दादूलाल तेली याच्याही खुनाची घटना घडली होती . या घटनांमुळे हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती . परंतु , पोलिस अधीक्षक राकेश कलासागर , अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे , सहाय पोलिस अधीक्षक यतीश देशमुख , पोलिस
उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ गोरेगाव येथील ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या नियंत्रणाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबूराव जाधव , पोलिस हवालदार राहुल गोटरे , पोलिस नाईक काशिनाथ शिंदे , पोलिस कर्मचारी श्री . खोकले या पथकाने प्रभावीपणे प्रक्रिया पार पाडून गुगुळ पिंपरी येथील व गोरेगाव येथील घडलेल्या खुनाच्या घटना तातडीने उघडकीस आणल्या . ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आयोजित पोलिस ठाणेदार पथकाची
उदय खंडेराय , पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे आदींचा समावेश होता . अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिस ठाणे गोरेगाव येथील टीमने अल्पावधीत दाखविलेल्या प्रभावी कामगिरीने प्रभावित होऊन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री . वाखारे , गोरेगाव ठाणेदार श्रीदेवी पाटील व त्यांच्या पथकाची प्रशंसा करून गौरव केला
टिप्पणी पोस्ट करा