हिंगोली येथे सरपंच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.....
माननीय आमदार श्री.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकप्रश्न सरपंच पुरस्कार सोहळा दिनांक 30 एप्रिल 2022 शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह रामलीला मैदानाजवळ हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते श्री.भास्करराव पेरे पाटील (उत्कृष्ट सरपंच,पाटोदा)व माननीय श्री.पंजाबराव डख(हवामान तज्ञ,परभणी)तसेच सत्कारमूर्ती श्री.भाऊराव पाटील गोरेगावकर (माजी आमदार विधानसभा हिंगोली) यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी हिंगोली जिल्ह्याती शेतकरी,व्यापारी व नवयुवकांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान श्री.भास्करराव रामराव बेंगाळ (अध्यक्ष विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा तथा अध्यक्ष ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नांदेड परभणी हिंगोली) व श्री. अभिषेक भैय्या भास्करराव बेंगाळ (अध्यक्ष महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटी विधानसभा हिंगोली सेनगाव) यांनी केले आहे.
إرسال تعليق