माळहिवरा जागृत हनुमान मंदिर येथे हभप रामराव ढोक महाराजाचे किर्तन....!ऍड.अमोल जाधव यांच्यातर्फे नगरभोजन कार्यक्रम...!



 माळहिवरा जागृत हनुमान मंदिर येथे हभप रामराव ढोक महाराजाचे किर्तन....!
ऍड.अमोल जाधव यांच्यातर्फे नगरभोजन कार्यक्रम...!
हिंगोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळहिवरा येथे जागृत हनुमान मंदिर माळहिवरा येथे ऍड.अमोल जाधव यांच्या नगरभोजन निमित्त ह.भ.प. रामराव ढोक महाराज याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी कमलदास महाराज खाकिबाबा संस्थान हिगोली, आत्मानंदजी गिरी महाराज सिद्धनाथ संस्थान गगलवाडी, दादाराव महाराज दिग्रसकर, नारायण महाराज खंदारे, पांडुरंग महाराज समगेकर, गायानचार्य काशिराम बुवा ईडोळीकर, डिगांबर कुटे, शंकर महाराज इंगोले, संभाजी महाराज बळेगावकर, दामोदर बुवा इंगोले, मुदुगाचार्य लखन महाराज लोहगावकर, आशिष महाराज भोयर देवठानेकर, सयोजक नामदेव महाराज शेळके इत्यादी महाराज मंडळी होते. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मा.आ. रामराव वडकुते, माजी खा.ऍड.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,माजी जि.प.अध्यक्ष गनाजी बेले, जि.प.उपाध्यक्ष मनिष आखरे, रुपाली ताई गोरेगावकर, उद्धवराव गायकवाड, भैया देशमुख, पोनि. केंद्रे, बाळासाहेब मगर, विठ्ठल चोतमल, सभापती भानुदास जाधव, दिलीप देसाई, रुपाजी पाटील, भानुदास वाबळे, हमिद प्यारेवाले, उत्तमराव जगताप, वकिल मंडळी, शिक्षक मंडळी. यावेळी माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, बेलोरा, आडगाव, आंबाळा, भिंगी, लिंबाळा, देवठाना, वांझोळा, बोंडाळा, फाळेगाव, कनेरगाव, कानरखेडा, वडद, एकांबा, बोडखी, हिरडी, जोडतळा, सिरसम, कलगाव, भिरडा, बांसबा, भांडेगाव, माळसेलु गावचे नागरिक व सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. माजी जि.प.सदस्य ऍड.अमोल जाधव यांनी जागृत हनुमान माळहिवरा येथे नगर भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाले. या प्रसंगी परिसरातील भक्तमंडळी ची अलोट गर्दी होती. कीर्तनाचा आनंद घेतला परीसरातील नागरीकांनी लाभ घेतला. माळहिवरा येथील युवक व वडीलधारी मंडळी यांनी खुप चांगले नियोजन करून सर्व व्यवस्था केली आहे.


Post a Comment

أحدث أقدم