सायन्स एक्सपो 2022 चे बक्षिस वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न..

सायन्स एक्सपो 2022 चे बक्षिस वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न..

विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न.

 शिक्षण विभाग हिंगोली व डोमेन मास्टर सुरज कदम अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जि.प.कन्या प्रशाला हिंगोली येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कुरवाडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण अधिकारी कुलकर्णी ,शिक्षणाधिकारी माध्यमिक कडेलवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीपकुमार सोनटक्के ,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळमनुरी दत्ता नांदे,महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी मुख्याध्यापक जे.जे.काळे,जि प कन्या प्रशाला हिंगोली मुख्याध्यापक जि.व्ही.गुंडेवार ,किरण राठोड जिल्हाध्यक्ष प्रहार आदींची उपस्थिती होती 1 मे 2022 रोजी संपन्न झालेल्या सायन्स एक्सपो 2022 विज्ञान प्रदर्शनातील .
प्रथम पारितोषिक सिम्पल मोबाईल चार्जिंग मशीन जि प प्रा शा सिंदगी द्वितीय पारितोषिक सोलार ग्रास कटिंग मशीन जि प प्रा शा हिवरा, तृतीय पारितोषिक इको फ्रेंडली अपार्टमेंट जि प प्रशाला मसोड तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक जि प प्रशाला आखाडा बाळापुर ,शिक्षक विज्ञानदुत या विभागात प्रथम पारितोषिक लाय फाय कुमार शहाणे जि प प्रा शा जटाळवाडी द्वितीय पारितोषिक नैसर्गिक सॅनिटायझर निर्मिती प्रियांका भिसे जि प प्रा शा  सालेगाव यांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम  सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
     याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डोमेन मास्टर सुरज कदम अमेरिका यांनी केले . जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितीन मोरे कार्य प्रवर्तक बालभवन विज्ञान केंद्र जि प कन्या प्रशाला हिंगोली ,सुशांत पाईकराव  उगम संस्था उमरा, शंकर लेकुळे तंत्रस्नेही शिक्षक जि प प्रा शा कोंढुर ,देविदास गुंजकर उपक्रमशील शिक्षक जि प प्रा शा  पुयना.तानाजीराव जगताप पर्यवेक्षक ,विकास कांबळे आदींनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा पंडित यांनी तर आभार प्रदर्शन आशिष मगर उपक्रमशील शिक्षक जि प प्रा शा ब्रह्म वाडी यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم