3 मे रोजी हिंगोली शहरातील वाहतूक वळवली
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर
रमजान ईद निमित्ताने 3 मे रोजी हिंगोली शहरातील वाहतूक सकाळी 8ते11 वाजेपर्यंत वळवली पर्यायी मार्गाचा वापर करावा
महाराष्ट्र 24 न्यूज
2मे 2022
शहरात रमजान ईद साजरी केली जाणार असून त्या निमित्त मुख्य ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून त्यामुळे रहदारीस अडथळा होण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत शांततेत रहदारी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही सन साजरा व्हावा तसेच सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यात करिता माननीय पोलीस अधीक्षक कलासागर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्राप्त झालेल्या 3मे रोजी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत हिंगोली शहरातील वाहतुकीच्या नियमाच्या संबंधाने अधिसूचना काढली असून त्यात नमूद काळात काही भागात वाहतुकीसाठी मार्ग बंद तर काही भागात पर्याय वाहतुकीचे मार्ग निश्चित केले आहेत
वाहतुकीकरिता बंद असलेली मार्ग
खालील प्रमाणे l
नांदेड नाका एन टी सी गेट बस स्टँड बावन खोली रोड संभाजी शाळे जवळील रोड कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील
कयाधू नदी कडून नांदेड नाकाकडे येणारा रोड पूर्ण बंद राहील
जड वाहनास बंद असलेला मार्ग
नर्सी टी पॉइंट खटकाळी बायपास अकोला बायपास हिंगोली शहरात येणारे सर्व वाहन सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत बंद राहतील
वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग मोकळा
हिंगोली शहरातून औंढा नागनाथ गाव कडे जाणे करता इंदिरा चौक गांधी चौक फुलमंडी गोदावरी कॉर्नर मेहराजुलूम मज्जिद खाकीबाबा चौक
कबरस्तान कयाधू नदी
हिंगोली शहरातून नांदेड कडे जाणाऱ्या जाण्याकरिता इंदिरा चौक नांदेड नाका रेल्वे गेट खटकाळी बायपास पाटी
जड वाहतूक वाशिम कडून नांदेड कडे जाण्याकरिता अकोला बायपास ते खटकाळी बायपास मार्ग नांदेड
नरसी कडून येणारे जड वाहतूक नार्सी टी पॉइंट वरून औंढानागनाथ कडे
आंबेडकर चौक गांधी चौक इंद्रा चौक नांदेड नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीसाठी चालू राहील
शहरात तगडा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे सायहक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख पोलीस निरीक्षक उदय खंडेराय
पोलीस निरीक्षक पंडित कचवे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू
साहयक पोलीस निरीक्षक शिवबास घेवारे
यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांचा शहरात बंदोबस्त राहणार आहे
हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून 3 मे रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत उपरोक्त प्रमाणे वाहतूक मार्गात बद्दल याप्रमाणे सूचना व आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हिंगोली यांनी केले आहे
إرسال تعليق