शहरामध्ये दामिनी पथक सक्रिय
हिंगोली (प्रतिनिधी)
17मे2022 मंगळवार
शहरातील शाळा महाविद्यालय परिसर तसेच बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, बाजारपेठ परिसर इत्यादी ठिकाणी महिला व मुलीं सोबत होणारे छेडछाडी व गुन्हयाच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहे.
महिला व विद्यार्थ्यांना सुरक्षीत वाटावे म्हणुन पोलिस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी हिंगोली शहरामध्ये दामिनी पथकाची स्थापना केली.
सदर दामिनी पथकामध्ये सहा.फौजदार कर्हाळे, महिला पोलिस अंमलदार घोंगडे, ढेंबरे व सावळे यांची नेमणुक केली असुन त्यांचे सोबत एक सुसज्ज चारचाकी वाहन दिले आहे. नमुद दामिनी पथक दररोज शहरातील मुख्य शाळा व महाविद्यालये तसेच बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, बाजारपेठ, धार्मिक स्थळे व इतर गर्दीचे परिसरात नियमित पेट्रोलिंग करीत आहेत
. पेट्रोलिंग दरम्यान नमुद पथकातील अंमलदार शाळा/महाविद्यालय व इतर ठिकाणी थांबुन विद्यार्थी व नागरिका सोबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करत असुन त्यांचे अडी अडचणी व समस्या जाणुन घेवुन त्या दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सदर ठिकाणी छेडछाडीच्या घटना होणार नाहीत याची दक्षता घेत आहेत. सोबतच पोलिस मित्र व सखा म्हणुन सदैव आपल्या सोबत आहे. याचाही विश्वास देत आहेत. दामिनी पथकाचे
परिणाम कारक पेट्रोलिंग मुळे शहरातील शाळा/महाविद्यालय व इतर ठिकाणी टवाळखोरी, चिडीमारी/छेडछाडीच्या घटनांनाही आळा बसला आहे.
إرسال تعليق