दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; चार दुचाकीसह ऐवज जप्त....!



दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; चार दुचाकीसह ऐवज जप्त

महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिनिधी
19मे2022
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी गुरुवार दि.१९ मे रोजी दुचाकी चोरणारी टोळी पकडली. त्यांच्याकडून चार दुचाकींसह विद्युत पंपाचे साहित्य असा एकुण पावने तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
      सुरजखेडा येथील शेतकर्‍यांनी शेतातील विद्युत पंप चोरीची तक्रार दिली होती. वीजपंप चोरीला जाण्याच्या घटना वारंवार होत असल्याने पोलिस निरीक्षक पाटील, जमादार राहुल गोटरे, श्याम उजगरे, काशिनाथ शिंदे, विजय कालवे यांच्या पथकाने आरोपींची शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेमध्ये पोलिसांनी दीपक काळुराम काटूळे, रवी गणपत मोरे, शंकर विश्वनाथ नितनवरे, गोविंदा बबन सोळंके, गोपाल बबन साळुंके (रा.सुरजखेडा) प्रभाकर विठ्ठल जाधव (रा.केकत उमरा, जि. वाशीम) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी विद्यूतपंप चोरीची कबुली दिली. यासोबतच हिंगोली शहर अकोला वाशिम या ठिकाणावरून दुचाकी चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी वाहने व विद्युत पंपाचे साहित्य असा पावने तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात अन्य एकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली  जात आहे.


Post a Comment

أحدث أقدم