हिंगणी गाव बिनविरोध निवडून घेणार सरपंच ...!!अतुल घुगे

राजकारणात रस न घेता सर्व गावकरी एकसंध आणि एकजुटीने राहून गावचा विकास साधू शकतात, शिवाय वेगळी पाऊलखूण उमटवू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील हिंगणी हे गाव होय...
हिंगोली जिल्ह्यात हिगणी या गावात या वेळी गावानी एक नवीन आदर्श ठेवला असून या वेळी गावामध्ये एका वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली ,काहि दिवसापुर्वी तंटामुक्ती अध्यक्ष निवड सुद्धा बिनविरोध करण्यात आली,व काल वि.का.से. सहकारी सोसायटी ची निवडणूक सुद्धा काल बिनविरोध करून दाखवली असे म्हणतात जिल्हाची  
सुत्र या गावातुन हालतात या गावात सर्व पक्षांची मात्तबर मंडळी राहतात तरी त्यांनी जो निर्णय घेतला तो प्रेरणादायी आहे गावचे युवा उंपसरपच ग्रांमसवाद सरपंच संघाचे जिल्हा अध्यक्ष अतुल पंढरीनाथराव घुगे यांनी मला माझ्या गावाचा अभिमान आहे असे सांगितले. लोकसभा असो वा विधानसभा किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती च्या. निवडणुकीच्या काळात राजकारणात अग्रेसर असणार गाव पातळीवर मात्र राजकारणा पासुन दुर रहात आहे . केवळ गावात सलोखा टिकून राहील याकडे लक्ष दिले जाते. कुठलीहि निवडणूक असो  सर्व प्रथम गावातील व्यक्तीचा विचार केला जातो कुणाच्याही आमिषाला बळी नं पडता गावातील व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे राहून गावाचा एकोपा कायम ठेवण्याचे काम करतात आजही या गावात सार्वजनिक हिताची कामे लोक वर्गणी तुन केली जातात. कयादु नदीच्या काठावर बसलेले हे गाव लोकसंख्या(.. 2000 आणि मतदार सुमारे 1300). सभोवती सुपीक काळीकुटं जमीन कयादु नदीच्या तीरावर वसलेले हरीहरनाथ महादेव मंदिर या गावाचे दैवत तस पहाता पुर्ण गाव हंरीहरनाथाचे भक्त आजहि  हरीहरनाथाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; या गावाने स्वबळावरच गावची अस्मिता फुलवली आहे. त्याला स्वाभिमानाचे खतपाणी घालून जपणूक सुद्धा केली. 
या वेळी गावात कोणत्याही संस्थेची निवडणूक आल्यास ग्रामपंचायतीत एका जाजमावर बसूनच स्थानिक निवडणुकांची औपचारिकता पूर्ण होते.
राजकारणात समाजसेवा करणारे एक मोठे नेतृत्व याच गावचे,
गावाच्या या एकूणच आदर्शपणाची जपणूक करण्यासाठी या गावचे भूमिपुत्र मा. आमदार गजाननराव घुगे, सरपंच,उपसरपच ,ग्राम पंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य तंटामुक्त अध्यक्ष, गावचे सोसायटी चेरमन, पोलिस पाटील, अगदी महत्त्वाचे म्हणजे गावातील युवा वर्ग आदी प्रमुख मंडळी हिरीरीने पुढाकार घेतात.
गावचे उपसरपंच अतुल पंढरीनाथराव घुगे यांच्यामते  एकीकडे राजकारणासाठी चांगले गाव वेशीला नेऊन टांगण्याची स्पर्धा सर्वत्र वाढू लागली असताना माझे गाव याला अपवाद आहे आमचे हिंगणी गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणणाऱ्या प्रत्येकांनी हिंगणी गावा सारखा वसा आणि वारसा जोपासल्यास सर्वांत पुढे महाराष्ट्र माझा असे सुभाषित तयार व्हायला वेळ लागणार नाही.

Post a Comment

أحدث أقدم