हिंगोली प्रतिनिधी
17जून2022
सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात केवळ 54 मि.मि. सरासरी पाऊस झाला असुन तो पेरणीयोग्य नसल्याने किमान 100 मि.मि. पाऊस होईपर्यंत व जमीनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे.
खरीप हंगाम 2022 मध्ये प्रस्तावित 353624 हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी आजपर्यंत हिंगोली जिल्हयात एकूण 55403 मे.टन रा. खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी 30041 मे.टन रा. खतांची विक्री झाली असुन आज रोजी जिल्हयात 25361 मे.टन रा. खतांचा साठा शिल्लक आहे.
शेतकऱ्यांनी केवळ DAP खताची मागणी करु नये त्यातही विशिष्ट उत्पादकाच्या DAP साठी आग्रह धरु नये आवाहन करण्यात येत आहे. वास्तविक पाहता सर्व कंपन्यांच्या DAP मध्ये 18% नत्र व 46% स्फुरद हेच घटक उपलब्ध असतात.
सोयाबीन पीकासाठी NPKS 20:20:00:13 या ग्रेडचे खत अतीशय उपयुक्त आहे कारण त्यामध्ये सोयाबीन बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर 13% आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी DAP ऐवजी NPKS 20:20:00:13 या ग्रेडच्या खताचा सोयाबीनसाठी वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच Urea SSP या दोन ग्रेडची खते DAP खताला उत्तम पर्याय असुन त्यामुळे जमीनीचा पोत सुधारतो तसेच SSP मध्ये सल्फर असल्याने सोयाबीन बियाणातील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तेव्हा सदरील खतांचा वापर सोयाबीन या पीकासाठी शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या बियाणे व रा. खतांच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर असे एकूण 06 तक्रार निवारण कक्षांची स्थापणा करण्यात आली आहे. तसेच 06 तक्रार निवारण कक्षांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रा. खत विक्रेते शेतकऱ्यांना विविध ग्रेडच्या खतासोबत इतर उत्पादनांची खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या जिल्हयातील 4 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
तक्रार निवारण कक्षाचे ठिकाण
जिल्हा स्तर
भ्रमणध्वनी क्रमांक
कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली तालुका स्तर
कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा ना.
9421490222
8087889299
कृषि विभाग, पंचायत समिती, वसमत
कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली
9028905357
9822699947
कृषि विभाग, पंचायत समिती, कळमन्री कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगांव
9673946799 9158121718
या व्यतीरिक्त शेतकरी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगोली व पाचही तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयातही तक्रार दाखल करु शकतात.
शेतकन्यांच्या सोईसाठी जिल्हयातील सर्व रा. खत विक्री केंद्रांवर शिल्लक असलेला रा. खताचा ग्रेडनिहाय साठा (मे.टन) याबाबत माहिती सहज उपलब्ध होणेसाठी ती हिंगोली जिल्हयाच्या website वर
आहे
إرسال تعليق