हळदवाडी गावाचा रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासन सर्तक

हळदवाडी गावाचा रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासन सर्तक

हिंगोली 
हळदवाडी ग्रामस्थ गेल्या दोन दिवसापासुन जिल्हा कचेरीसमोर रस्त्याच्या मागणीसाठी ठाण मांडुन आहेत. यामध्ये वृद्ध, चिमुकले बालके, महिला व ग्रामस्थांचा समावेश आहे. भर पावसात त्यांची अवस्था अंत्यंत बिकट झाली होती. परंतु वादळाला व पावसाला न जुमानता हि मंडळी जिल्हाकचेरी समोर न्याय मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासुन ठाण मांडुन आहे. प्रशासन रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्तक झाल्याचे दिसुन आले. यातुन तिढा सुटणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन हळदवाडी करांचा रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहे. हळदवाडी गावाला रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून दुसर्‍या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरू आहे. गुरुवारी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ.रामराव वडकुते यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

त्यानंतर तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लव्हेश तांबे यांनी उपोषण स्थळी येऊन रास्ता तयार करण्यासाठी नकाशा पाहत होते. त्यानंतर तांबे यांनी हळदवाडी येथे जाऊन रस्त्याची पाहणी केली. उशिरापर्यंत तहसील कार्यालयात उपोषण कर्ते व अधिकारी रस्त्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करीत होते. रात्रीचे सव्वा सात वाजले तरी तहसील कार्यालयात बैठक सूरू होती. रस्त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांना तोडगा काढण्याचे सांगितले. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी रस्त्याचा तिढा सुटण्यासाठी तहसीलदारांना  सुचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनीही बिडीओं व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना केल्या आहेत. याठिकाणी मातोश्री पांदण योजनेतुन रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. 

Post a Comment

أحدث أقدم