हिंगोली शहरातील सर्व स्कूल बस चालकांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र 24न्यूज
25जून2022
हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत 27 जून रोजी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात सकाळी 11 वाजता हिंगोली शहरातील सर्व स्कूल बस चालकांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनानुसार शहर पोलीस ठाण्यात 27 जून रोजी सकाळी अकरा वाजता स्कूल बस चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिष देशमुख,यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. नेत्ररोग तज्ञ यांच्यामार्फत स्कूल बस चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी हिंगोली शहरातील सर्व स्कूल बस चालकांनी या शिबिरात येऊन आपल्या नेत्रांची तपासणी करून घ्यावी असे आव्हान शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी केले आहे.
إرسال تعليق