हिंगोलीत लाच घेणाऱ्या तीन सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत लाच घेणाऱ्या तीन सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
 
हिंगोली प्रतिनिधी 
24जून2022
महाराष्ट्र 24 न्यूज 
सावकारी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (२३ जून) दुपारी तीन वाजता ताब्यात घेतले.
हिंगोली तालुक्यातील एका सावकाराला त्याचा सावकारी परवाना नूतनीकरण करावयाचा होता. त्यासाठी सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाच हजारांची लाच मागितली. केली होती दरम्यान 
उपअधीक्षक 
नीलेश
 सुरडकर, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, पोलिस निरीक्षक पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय शुक्ला विजय उपरे, तानाजी मुंडे, रुद्रा कबाडे, राजाराम फुपाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, आदींच्या पथकाने सहायक निबंधक कार्यालयासमोर सापळा रचला होता. दरम्यान, लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम वरिष्ठ लिपिक संजय पिसाळकर याने घेतली. त्यावरून पोलिसांनी पिसाळकर याला ताब्यात घेतले असून ही रक्कम मागणीमध्ये सहायक निबंधक अभय कटके कर्मचारी ए. जी. राठोड यांचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिसात आरोपी   आत्माराम भुजा राठोड, सहकार अधिकारी श्रेणी-१, वर्ग -3, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, हिंगोली रा. जिनमाता नगर, हिंगोली
अभयकुमार देवराव कटके, सहायक निबंधक सहकारी संस्था, वर्ग -2, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय,हिंगोली  रा. पार्वतीनगर, परभणी
3)संजय पुंजाराम पिसाळकर, प्रमुख लिपिक, वर्ग -3, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, हिंगोली रा. हनुमानगर, हिंगोली या तीन लाचखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला 

Post a Comment

أحدث أقدم