हिंगोली दामिनी पथकाची तत्परता - अपघातग्रस्तांना मदत -

दामीनी पथकाची तत्परता - अपघातग्रस्तांना मदत - अपघातातील जख्मींना

तात्काळं पोलीस  वाहनातुन उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल.

हिंगोली शहरातील शाळा महाविदयालय परीसर तसेच बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, बाजारपेठ परीसर इ. ठिकाणी महीला व मुली सोबत होणारे छेडछाडी व गुन्हयाच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच महीला व विदयार्थाना सुरक्षीत वाटावे म्हणुन मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर यांनी हिंगोली शहरामध्ये दामिनी पथकाची स्थापणा केली असुन सदर दामिनी पथकामध्ये सफौ. शिंदे, महीला पोलीस अंमलदार नंदा धोंगडे, शारदा ढेंबरे  व आरती सावळे यांची नेमणुक केली असुन नमुद दामीनी पथक एक सुसज्ज चारचाकी वाहनातुन शहरात दररोज नियमितपणे सतर्कपणे पेट्रोलींग करीत आहेत.
दिनांक- ०३/०६/२०२२ रोजी दुपारी १२.३० वा. दरम्याण हिंगोली शहरातील रेल्वे ब्रिज रिसाला जवळील रोडवर सोडगाव येथील राहणारे नामे- शेषराव भाउराव चव्हाण वय ८५ वर्ष हे त्यांचे मुलीसंह स्कुटीवरून जात असतांना अपघात होवुन त्यांना गंभीर दुखापत होवुन पडलेले होते. नमुद वेळी दामीनी पथकातील वरील अंमलदार हे वाहनाने पेट्रोलींग करीत आदर्श कॉलेजकडे जात असतांना त्यांना सदर अपघातात जख्मी ईसम दिसले तेंव्हा तात्काळ दामीनी पथकातील वरील अंमलदारांनी तत्परता दाखवुन नमुद जख्मी शेषराव चव्हाण व त्यांचे मुलीला  पोलीस पेट्रोलींग वाहनातुन रुग्णालयात आणुन भरती केले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ जख्मींवर उपचार सुरू केल्याने नमुद दोन्ही जख्मी इसमांचे जिव वाचले असुन सध्या त्यांचेवर लक्ष्मी क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु असुन जख्मी दोघांचीही पृकृती चांगली आहे. लगेच दामीनी पथकातील वरील अंमलदार यांनी जख्मींच्या नातेवाईकांना माहीती देवुन त्यांना रुग्णालयात बोलावुन घेतले व पेट्रोलींग दरम्याण संध्याकाळी परत रुग्णालयात जावुन आपुलकीने जख्मींना भेटुन त्यांचे तब्येतीची विचारपुस केली. दामीनी पथकातील अंमलदार यांनी देवदुता सारखे मदतीला येवुन तत्परतेने अपघातातील वरील जख्मींना तात्काळ आपल्या वाहनातुन उपचारासाठी रुग्णालयात आणुन भरती करून मदत केली ....मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश कलासागर यांनी दामीनी पथकाच्या नमुद कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले

Post a Comment

أحدث أقدم