भेटण्यास नकार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली : भेटण्यास नकार का दिला, या कारणावरून एकाने दुर्ग सावंगी येथील ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तुझे व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली. ही घटना हिंगोली शहरातील एका देवस्थानाजवळ २ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
हिंगोली तालुक्यातील दुर्ग सावंगी येथील रुपेश जमदाड याने गावातील ३० वर्षीय महिलेस भेटण्यास बोलावले होते. मात्र महिलेने भेटण्यास नकार दिला. २ जून रोजी महिला हिंगोली शहरातील एका देवस्थानाजवळ आली असता रुपेश जमदाड हादेखील आला. महिलेस थापडाबुक्क्याने मारहाण करून तु भेटण्यास आली नाही तर, व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रुपेश जमदाड याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
إرسال تعليق