हिंगोलीत झन्ना-मन्ना जुगारावर छापा; ९ जणावर गुन्हा
महाराष्ट्र 24न्यूज
30जून2022
हिंगोली "शहरातील
मस्तानशहा नगर भागामध्ये २९
जूनला
झन्ना-मन्ना जुगारावर छापा
मारून १९ हजाराचा मुद्देमाल जप्त
करून ९ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल
करण्यात आले.
हिंगोली शहरामध्ये महिन्यापासून काही ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी अवैध धंद्यावर छापे मारण्याच्या सूचना दिल्याने पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या आदेशाने मस्तानशहा नगर भागात झन्नामन्ना जुगारावर छापा मारला. ज्यामध्ये घटनास्थळी नगदी ७९०० रुपये यासह मोबाईल, असा एकुण १८९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी
हिंगोली शहर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख इम्रान शेख सलीम रा. बावनखोली, जावेदखॉ नसीदखॉ पठाण रा. पेन्शनपुरा, समीरशहा शब्बीरशहा, शेख अलताफ शेख रशीद, शेख अफताब शेख अमजद, शेख अजीम शेख इब्राहीम, शेख वहाब शेख लाल सर्व रा. मस्तानशहा नगर, शेख असपाक शेख वहाब, प्रदिप उत्तम आठवले या ९ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यापुढे हिंगोली शहरात अवैध मटका जुगार चालक मालकावर बेधडक कारवाई करू असे
हिंगोली शहरचे पोलीस निरीक्षक पंडीत कचवे यांनी सांगितले
إرسال تعليق