२५१५ लेखाशिर्षांतर्गत मंजुर कामांची कार्यवाही स्थगित करावी
आ.तान्हाजी मुटकुळे
हिंगोली प्रतिनिधी
3 जुलै 2022
महाविकास आघाडी शासनाच्या काळात २५१५ लेखाशिर्षातर्ंगत कोटयावधी रुपयांची कामे अतिशय घाईगडबडीत व कोणतेही नियोजन न करता मंजुर करण्यात आली आहेत. आता महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यामुळे महाविकास आघाडी मंजुर करण्यात आलेल्या कामांना स्थगिती देण्याच्या मागणीचे निवेदन आ.तान्हाजी मुुटकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात सत्तांतरणा झाले आहे. यापुर्वीच्या शासनाच्या काळात २५१५ लेखाशिर्षांतर्गत कोटयावधी रुपयाची कामे अतिशय घाईगडबडीत व कोणतेही नियोजन न करता मंजुर करण्यात आली आहेत. तसेच कामे मंजुर करतांना भौगोलिक समतोल साधल्या गेला नाही. त्यामुळे २५१५ लेखाशिर्षातर्ंगत मंजुर कामांची पुढील कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी व कार्यारंभ आदेश देऊ नयेत अशी मागणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
إرسال تعليق