कनेरगाव नाका येथे नानाजी देशमुख कृषी योजने मध्ये अधिकारी गुहाडे यांचा मनमानी कारभार सुरू.
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे नानाजी देशमुख कृषी योजना ही राज्य सरकारच्या देखरेख खाली चालत असून.त्यामधे कृषी विभागातील अधिकारी वर्ग हा आपली मनमानी कारभार करताना दिसून येत आहे.
कनेरगाव नाका येथे सुपरवायजर या पदावर रुजू असलेले श्री. गुहाडे हे घरी बसल्या कारभार पाहत आहेत.त्यांनी तर आपल्या कामाचा कार्यभार हा गावातील लोकांवर ठेवला आहे. कोणत्याही व्यक्ती ला पाठवितात व ते सांगतात की साहेबांनी पाठविले तुमच्या तुषार सिंचन तसेच अनेक कामाची पाहणी करायची आहे व कामासाठी पैसे पण लागतात असे शेतकरी वर्गाला मागणी करतो.
भीती पोटी आपले काम होणार नाही म्हणून शेतकरी हा संभ्रमात पडून पैसे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे काम होत नाही
तुम्ही तक्रार माझी कुणाकडेही करा
मी पैसे घेतल्याशिवाय एका शेतकऱ्याचे काम करणार नाही असे गुहाडे यांनी स्पष्ट केले आहे
अशी तक्रार नानाजी देशमुख कृषी योजनेचे कानडखेडा बू. येथे कार्यरत असलेले कृषी मित्र श्री. विकास पठाडे व दीपक डोळसकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा