हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड स्पर्धा संपन्न

हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड  स्पर्धा संपन्न 

हिंगोली प्रतिनिधी
14 ऑगस्ट 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य जिल्हा पोलीस दलातर्फे ७५ कि.मी. दौड चे उददीष्ट ठेवुन दिनांक २६/०७/२०२२ ते १२/०८/२०२२ पर्यंत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी ६५ कि.मी.चे दौड पुर्ण केले असुन आज रोजी मा. पोलीस अधीक्षक हिंगोली  राकेश कलासागर यांचे मार्गदर्शनात १० कि.मी. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड” स्पर्धेचे आयोजन संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले होते. 
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौडमध्ये जिल्हा पोलीस दलातील व गृहरक्षक दलातील अधिकारी व अमंलदार मोठया संख्येने सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन टि शर्ट चे वाटप करण्यात आले  दौड स्पर्धेला मा. हिंगोली जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा  संजय दैने, मा. अपर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे, मा. सहा. पोलीस अधीक्षक  यतीश देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवुन सुरूवात केली सदर कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, प्रभारी पोलीस उप अधिक्षक (गृह) श्री. सोनाजी आम्ले यांची उपस्थिती होती.

सदर दौड़ ही संत नामदेव मैदान येथुन सुरू होवुन पुढे इंदीरा चौक नांदेड नाका- कयादु पुल नर्सी फाटा- राहोली खु. पाटी येथुन परत त्याच मार्गे पोलीस मुख्यालय मैदान येथे दौड समाप्तीचे ठिकाण होते. दौड स्पर्धेमध्ये पुरूषामधुन पोलीस अंमलदार सहदेव नामदेव जाधव परमेश्वर रूस्तुमराव ढाले  प्रभु उत्तमराव मुकाडे तर महीलांमधुन पोलीस अंमलदार  विजया संतोष ठेंगडे संध्या दत्तराव आगाशे सविता विजय कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय कंमाक पटकाविला. गृहरक्षक दलामधील  परमेश्वर तुकाराम कोरडे सतिष बाबुराव जाधव यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला स्पर्धेतील विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी मा.पोलीस अधीक्षक यांचे हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने