हिंगोली पोलीस विभागाच्या वतीने महत्वाच्या पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च

हिंगोली पोलीस विभागाच्या  महत्त्वाच्या पोलीस स्टेशन अंतर्गत  विविध भागातून रूट मार्च 
हिंगोली प्रतिनिधी
26 ऑगस्ट 2022
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आज सकाळी हिंगोली शहरातील विविध भागातून रस्त्याची पाहणी करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोळा  गणेश उत्सव अनुषंगाने 
हिंगोली शहरातील विविध रूट मार्च काढून प्रमुख रस्त्याची पाहणी केली 

जिल्ह्यातील महत्त्वाच्या काही पोलीस स्टेशन
अंतर्गत प्रमुख रस्त्यावर रूट मार्च काढून
पोलीस अधिकाऱ्यांनी विविध भागाची पाहणी केली 
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख 
पोलीस निरीक्षक पंडित कचवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेंबाडे 
अभियंता रत्नाकर अडसरे
यांच्यासह
एम एस ई बी विभागाचे
अधिकारी कर्मचारी रूट मार्च दरम्यान उपस्थित होते
हिंगोली नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तसेच अतिक्रम सुद्धा काढण्याचा सूचना अतिक्रमणधारकांना दिल्या आहेत
दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश कलासागर  यांनी सांगितले की
पोळा गणपती महोत्सव नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा
सणासुदीच्या काळात नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुद्धा करण्यात येईल असे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे

Post a Comment

أحدث أقدم