दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे जेरबंद
आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी
प्रतिनिधी
शंकर धुमाळ
शहरातील टापरे चौकात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले 'असून त्यांच्याकडून हत्यारे, दोन चारचाकी वाहने व मोबाईल असा एकुण १३ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, घेवारे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. काळे, जमादार सुरेश घुगे, मारोती तेलंग, पोलीस नायक बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, • जमादार तानाजी येळगे, मोतीराम पवार, बालाजी यादगीरवाड, चालक हेमंत बिचकेवार, शेख कलीम यांचा समावेश असलेले पथक २५ ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालीत असताना १०.४५
वाजण्याच्या सुमारास टापरे चौकात काही जण संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना पकडून
ते दरोड्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांच्याजवळून मोबाईल हँडसेट एम. एच.४३ - ए.एक्स ६५३० या क्रमांकाची स्वीफ्ट डिझायर, एम.एच.१२- एस.एफ. २३३१ या क्रमांकाची महिंद्रा बोलेरो दोन चारचाकी गाड्या असा एकुण १३ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. राजेंद्र ऊर्फ दादा छगन काळे (४८, व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), संजय ऊर्फ पिल्या ऊर्फ भैया पि. राजेंद्र ऊर्फ दादा काळे (२५, व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), नितीन भारत • डिकले (२८, व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद) प्रदिप बाळासाहेब चौधरी (२७, व्यवसाय बेकार रा. उरळीकांचन, ता. हवेली जि. पुणे)
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे खंजर, तलवार, हातोडी, सब्बल, टॉमी, लोखंडी रॉड, दोर, मिरची पुड आढळली. यांना पकडले.
दरोड्याच्या तयारीत ... खा. चिखलीकरांनी,
इतर माराचा फायदा घेऊन पसार झालेला नागपुर बायपास रोडवरून येणाऱ्या-जाणाऱ्या उलम लोकांना वाहनांना अडवून वाहनातील लोकांना लुटण्याच्या इराद्याने वाले होते, अशी कबुली त्यांनी दिली. त्यांच्याविरुद्ध तरी शेतावर नदिड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. ५२०/२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बरोबर असलेले रविंद्र बप्पा काळे (रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), शंकर सुरेश काळे (रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), अनिल रमेश शिंदे (रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद), अरुण बबन शिंदे (रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद) हे चौघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे अटक केलेल्या लोकांनी पोलिस तपासात सांगितले. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थागुशाच्या पथकाचे कौतुक केले
إرسال تعليق