सेल्फीच्या नादात रेल्वेची धडक, पुण्याच्या तरुणाचा हिंगोलीत मृत्यू
हिंगोली येथील रेल्वे रुळाच्या बाजूला सापडला तरुणाचा मृतदेह
प्रतिनिधी हिंगोली
महाराष्ट्र 24न्यूज
पुणे येथील एका तरुणाचा हिंगोली येथील रेल्वे रुळाच्या बाजूला मंगळवारी (१६ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता मृतदेह आढळून आला. स्वप्निल माणिकराव लहाळे (२०) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
दरम्यान
सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार संजय मार्के, डोंगरदिवे, शेषराव पोले, शेख मुजीब, असलम गारवे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृताच्या कानामध्ये हेडफोन लावलेले दिसले. तसेच शर्टवर ग्रीस लागल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या मृतदेहाची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा मृतदेह पुणे येथील स्वप्नील लहाळे या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. स्वप्नील हा दोन दिवसापूर्वीच हिंगोली कमलानगर नातेवाईकाकडे आला होता. सोमवारी १५ दुपारपासूनच तो बेपत्ता झाला होता. धावत्या रेल्वे समोर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नामध्ये रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृत स्वप्नीलला सेल्फी काढण्याचा छंद होता, असे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे स्पष्ट केल्याचे पोलिस सूत्रांनी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील रेल्वे रुळाजवळ काल दुपारी दोन वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस निरीक्षक पंडीत काच्वे अनिल काच मांडे यांनी सांगितले.
إرسال تعليق