शेवाळा येथे गळा चिरुन एकाचा खुन
महाराष्ट्र24न्यूज
आखाडा बाळापूर
हॉटेलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास चहा घेत असताना अचानक समोरून येऊन धारदार शस्त्रांनी नरवाडे त्यांच्या गळ्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना शेवाळा येथे दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे.
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे दि.१सप्टेंबर रोजी गौतम धोंडबा नरवाडे (वय ५०) हे सकाळी एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना अचानक समोरून येऊन मुस्तफा जिलानी (वय २५) यांनी गौतम नरवाडे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने गौतम नरवाडे हे जाग्यावरच गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता. ही घटना वार्यासारखी परिसरात पसरली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. होते. काही तासांतच आरोपी मुस्तफा जिलानी याला आखाडा बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौतम नरवाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास आखाडा बाळापूर पोलिस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा