नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेची जय्यत तयारी
हिंगोली : नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा २०२२ हिंगोलीत घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त पोलीस दलाच्या वतीने 'जय्यत तयारी केली जात आहे.
नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस क्रिडा स्पर्धा हिंगोलीत घेण्यात येणार असल्याने त्यानिमित्ताने जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा जय्यत तयारी करीत
आदर्श महाविद्यालयाच्या
मैदानावर फुटबाल व हॉकी स्पर्धा घेण्यात येणार असल्याने १६ सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतिष देशमुख यांनी पाहणी करून काही मार्गदर्शक सुचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, प्रा. आनंद भट्ट, संजय मार्के आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق