पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; मोबाईलसह नगदी रक्कम पळविली

पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; मोबाईलसह नगदी रक्कम पळविली

महाराष्ट्र 24न्यूज
 नेटवर्क 14 सप्टेंबर 2022

हिंगोली कळमनुरी शहरातील साई नगरमध्ये राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मोबाईलसह नगदी १० हजार रुपये असा एकुण १७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने सर्व सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांची वचक चोरट्यावर राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी विनायक अंकुशराव जाधव हे साई नगरात वास्तव्यास असून १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्य त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील नगदी १० हजार रुपये आणि एक सात हजार रुपयाचा मोबाईल असा एकुण १७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कळमनुरी शहरात यापूर्वीही अनेक करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने तपास सांगळे हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم