युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आज हिंगोली दौऱ्यावर
हिंगोली दि. १३ (प्रतिनिधी) - युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे बुधवारी १४ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली येथे युवा सेनेचे पदाधिकारी व युवा सैनिकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी दिली.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे मागील काही दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे बुधवारी १४ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड येथून सकाळी ११ वाजता निघणार आहेत. वसमत दुपारी १२ वाजता आगमन व व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दीड वाजता वसमत येथून कळमनुरीकडे रवाना होणार आहेत. कळमनुरी येथील सारडा मंगल कार्यालय येथे ३.५० वाजता बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हिंगोली शहरात आगमन आणि येथील कयाधू अर्बन निधी लिमिटेड शिवनेरी चौक, अकोला बायपास येथे बैठक घेणार आहेत. तसेच ७ वाजता हिंगोली येथून औंढा नागनाथकडे प्रस्थान करुन नागनाथाचे दर्शन घेऊन जिंतूर मार्गे परभणीकडे रवाना होणार असल्याची माहिती युवा सेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवा शिंदे यांनी दिली.
إرسال تعليق