कळमनुरी रुग्णालयात एका मातेने दिला जुळ्यांना जन्म

कळमनुरी  रुग्णालयात एका मातेने दिला जुळ्यांना जन्म

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क28 सप्टेंबर 
2022
हिंगोली जिल्ह्यातील
कळमनुरी
रुग्णालयातील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी
रुग्णालयात एका गरोदर मातेने दोन जुळ्यांना जन्म दिला असून त्यामध्ये एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे. सध्या त्या मातेची व दोन्ही बाळांची तब्येत चांगली असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात २६ सप्टेंबर रोजी रुक्मिना श्रीराम पांडे (२५) ही गरोदर महिला प्रसुतीसाठी रुग्णालयांत दाखल झाली असता तेथील डॉक्टरांनी प्रसूतीपूर्व वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये त्या महिलेच्या गर्भाशयात जुळी बालके असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे त्या महिलेची प्रसूती करणे अवघड होते; परंतु डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसुतीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करून रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. शिवकुमार हजारे, डॉ. अभिजित बांगर, अधिपरिचरिका सुमन घुले यांनी त्या महिलेची डॉक्टरी कौशल्याने प्रसूती केली यात या महिलेने एका मुलास व एका मुलीस जन्म

दिला असून सध्या महिला व दोन्ही जुळी बालकांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या या कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, बैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय डोंगरे, श्रीमती बेंगाळ आदींनी रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم