लक्ष्मी लाईफ केअरमध्ये हिंगोलीतील पहिली मोफत 'अँजिओग्राफी' यशस्वी

लक्ष्मी लाईफ केअरमध्ये हिंगोलीतील पहिली मोफत  'अँजिओग्राफी' यशस्वी

महाराष्ट्र 24न्यूज 
नेटवर्क 
5 सप्टेंबर 2022

हिंगोली जिल्ह्यातील पहिली अँजिओग्राफी प्रक्रिया हिंगोलीतील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मोफत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. 
सय्यद मुनीर सय्यद अझम वय 55 वर्ष राहणार अजम कॉलनी हिंगोली
रुग्ण सध्या ठणठणीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अखिल अग्रवाल यांनी सांगितले की, दोन दिवसापूर्वी एक रुग्ण हृदय रोग विषयक समस्या घेऊन तपासणीसाठी दाखल झाला होता. तपासणीअंती रुग्णाचे अँजिओग्राफी करण्याचे निश्चित करण्यात आले. 
दरम्यान
रुग्णास संपूर्ण कल्पना देऊन अँजिओग्राफी केली असता दोन धमण्यांमध्ये ९० टक्के ब्लॉकेज असल्याचे लक्षात आले. अँजिओग्राफी दरम्यानच रुग्णाच्या नातेवाईकाला अँजिओप्लास्ट विषयी कल्पना देण्यात आली. विशेष म्हणजे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत

मध्ये उपचार करून दोन स्टेन टाकण्यात आल्या. सद्यस्थितीत रुग्ण स्थिर असून विना खर्च अँजिओप्लास्टी झाल्याने त्यांचे नातेवाईक सुद्धा समाधान व्यक्त करीत असल्याचे डॉ. अखिल अग्रवाल यांनी सांगितले. 
या प्रक्रियेकरिता डॉ. गजानन झंवर, डॉ.अखिल अग्रवाल यांना भूलतज्ञ डॉ. प्राची अग्रवाल व रेडीओलॉजिस्ट डॉ. मयूर अग्रवाल यांनी सहकार्य केले. हिंगोली जिल्ह्यातील पहिलीच मोफत  अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया असून आता हिंगोली सोडून इतर कोणत्याही शहरांमध्ये जाण्याची रुग्णाला आवश्यकता नसल्याचे डॉ. अखिल अग्रवाल यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم