महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 30 सप्टेंबर 2022
बलात्कारप्रकरणी १० वर्षे व अ.जा.ज.प्र.कायद्यान्वये आरोपीस जन्मठेपीची शिक्षा
दि ०८/१२/२०१७ रोजी पो.स्टे. हिंगोली ग्रामीण येथे पिडीतेच्या आईने फिर्याद दिली की, दि. ०८/१२/२०१७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष ही कोचींग क्लासेस करून तिच्या मैत्रीणसोबत येत असताना बायपास रोड हिंगोली येथे अँटोचालक आसेफ व त्याच्या मित्राने हाताला व पायाला धरून अॅटात टाकले व अॅटोत टाकून देवाळा व कोथळज शिवार येथे घेवुन गेले. व आरोपी आसेफने चाकुचा धाक दाखवुन माळरानात नेले व तिच्या सोबत जबरदस्तीने तिचेवर जबरी व संभोग केला ( बलात्कार केला.) व या घटनेची माहिती कोणाला सांगीतली तर तुला जिवे मारण अशी धमकी आरोपीने त्या पिडित मुलीस दिली. या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द पो.स्टे हिंगोली ग्रामीण येथे गु.र.नं. ३१९ / २०१७कलम ३७६ (२) (एम), ३७६ (२) (जे), ३६३, ३६६,५०६, ३४ भा.दं.वि. व ४.१२ बा.ले.अ.प्र. का. ३ (१) (W) (२), ३ (२) (५) अ.जा. ज. प्र. कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास करणार डॉ सिदधेश्वर भोरे उपविपो अधिकारी व तसेच प्राथमिक तपास करणार पोउपनि श्रीमती एस.एस. केंद्रे रा
पोलीस हावदार
राहुल गोटरे यांनी सदर गुन्हयाचा तपास करून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे या प्रकरणास विशेष (बा. लैं. अ.प्र.का) खटला क. ०७/२०१८ देण्यात आला. सदरचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.जी. कांबळे साहेब यांच्या समोर चालले. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती सविता एस. देशमुख यांनी एकूण १७ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी आणि पिडीता तसेच इतर साक्षीदाराचा पुरावा ग्राह्य धरून आज दि. ३० / ०९ / २०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.जी. कांबळे साहेब, हिंगोली यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी शेख आसेफ शेख रज्जाक, वयः २१ वर्षे रा. रिसाला बाजार हिंगोली ता. जि. हिंगोली यास ३७६(२)(एम),३७६(२) (जे) (जे) भा.दं.वि. नुसार दोषी ठरवून १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रू.३,०००/- दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच कलम ३६६ मध्ये १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ३,०००/- दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्याची कारावासाची शिक्षा ५०६ भा.दं.वि. नुसार पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोषी ठरवून २ व सक्षम कारावास व रू.२०००/- दंड आणि दंड न भरल्यास ०२ महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच कलम १२ बा.ले.अ.प्र. कायदा २०१२ नुसार - दोषी ठरवुन २ वर्षे सक्षम कारावास व रू. २०००/- दंड आणि दंड न भरल्यास २महिने तसेच ३(१) (W) (२), मध्ये ३ महिने शिक्षा व ५०० रु दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा, ३ (२) (५) अ.जा.ज.प्र.कायद्याप्रमाणे जन्मठेपीची कारावासाची शिक्षा सुनावली.
सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील श्री एस. डी. कुठे व श्री. एन. एस. मुटकुळे तसेच आणि कोर्ट पैरवी अधिकारी श्री. टी. एस. गोहाडे व पो.उप.नि. व श्री किशन राजाराम डुकरे पोउपनि पो.स्टे. हिंगोली ग्रामीण तसेच तत्कालीन महिला कोर्ट पैरवी ज्योती खिल्लारे महिला पोहेकॉ यांनी - सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा