स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची धडाकेबाज कार्यवाही'

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची धडाकेबाज कार्यवाही'

सरकारी कामात अडथळा सोबत खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्हयात मागील ४ महीण्यापासुन फरार असलेला व परभणी पोलीस शोध घेत असलेल्या आरोपीस सापळा रचुन पकडले
सदर प्रकरणी माहीती अशी कि, फिर्यादी नामे नारायण जिजाराव पोले  नौकरी पोलीस नाईक ब.नं / ११३९ नेमणुक पो.स्टे. कोतवाली जि.परभणी हे त्यांचे कर्तव्य करीत असतांना दिनांक २६/०५/२०२२ रोजी आरोपी नामे- अजय उर्फ अज्जु सुधाकर वाव्हळे हा त्यांचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला व जीवे मारण्याच्या उददेशाने चाकु मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी पोलीस अंमलदारांच्या वाहनाची तोडफोड करून १५००० रू. चे नुकसान केले होते. सदर प्रकरणी वर नमुद पोलीस अंमलदार यांचे फिर्याद वरून पो.स्टे. कोतवाली जि. परभणी येथे गुरनं. १५० / २०२२ कलम ३०७, ३५३, ४२७ भादवी अन्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यापासुन नमुद आरोपी हा फरार झाला होता व पोलीसांना मिळुन येत नव्हता. परभणी पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. सदर आरोपी हा हिंगोली शहर परीसरात असल्याची शक्यता असुन त्याची कोणतीही माहीती मिळाल्यास कळविणे किंवा त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन कळविने बाबत स्थागुशा परभणी व पो.स्टे. कोतवाली परभणी यांनी नमुद आरोपीचे फोटोसह स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे माहीती दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनात पोलीस पथकाने दिनांक २९/०९/२०२२ रोजी सापळा रचुन अतिशय शिताफीने सिध्दार्थ नगर हिंगोली येथून नमुद आरोपी नामे- अजय उर्फ अज्जु सुधाकर वाहुळे वय २४ वर्ष रा. दर्गा रोड परभणी यास पकडले व त्याबाबत माहीती परभणी पोलीसांना माहीती देवुन परभणी पोलीस पथक हिंगोली येथे आल्यावर आरोपीस त्यांचे ताब्यात दिले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. उदय खंडेराय, सपोनि. राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, सुनिल अंभोरे, राजु ठाकुर, आकाश टापरे, चालक प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने