हिंगोलीत पोलीस स्पर्धकांनी दाखविले नैपुण्य
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 22 सप्टेंबर 2022
हिंगोली शहरात २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धेला २० सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. चार जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी स्पर्धेसाठी दाखल झाले असून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक पोलीस स्पर्धकांनी आपले नैपुण्य दाखविल्याने अनेकांचे लक्ष वेधल्या गेले होते.
परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये अॅथेलेटिक्स, कुस्ती, बॉक्सींग, जुडो, त्वायकांदो, स्वीमिंग तसेच सांघीकमध्ये कबड्डी, खो खो, हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉलीबॉल आदी स्पर्धा घेतल्या जात आहेत. २० सप्टेंबर पासून या स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. शहरातील सात मैदानावर विविध ठिकाणी स्पर्धा घेतल्या जात असून जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजन आले आहे. २३ सप्टेंबर रोजी स्पर्धांचा समारोप असून नांदेड.
नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा स्पर्धेत हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या चार जिल्ह्यातील ५१२ पोलिंस अधिकारी, अंमलदार, महिला-पुरूष सहभागी स्पर्धेचा २३ सप्टेंबरला होणार समारोप
परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ चे समादेशक संदीपसिंह गिल्ल तसेच नांदेड, लातुर, परभणी येथील पोलिस अधिक्षकासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मेडल्स, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत अनेक नामवंत पोलिस अधिकारी व कर्मचारी खेळाडु म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांनी स्पर्धेत दाखविलेल्या नैपुण्यामुळे अनेकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेले.
إرسال تعليق