हिंगोलीत २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेला सुरूवात

हिंगोलीत २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेला सुरूवात

महाराष्ट्र24 न्यूज
 नेटवर्क 20 सप्टेंबर 2022 
हिंगोलीत यावर्षी २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेचे अयोजन  जिल्हा पोलीस दलाकडुन करण्यात आले असुन सदर स्पर्धा  दिनांक २०/०९/२०२२ सुरू होवुन दिनांक २३/०९/२०२२ रोजी स्पर्धेचा समारोप समारंभ होणार आहे
  स्पर्धेत १) हिंगोली २) नांदेड, ३) लातुर, ४) परभणी या ०४ जिल्हयातील ५१२ पोलीस अधिकारी व अंमलदार (पुरूष व महिला) सहभागी झाले आहेत. किडा मधील सर्व प्रकारात ज्यात व्ययक्तीक अॅथेलेटीक मधील सर्व स्पर्धा, कुस्ती, बॉक्सींग, ज्युदो, स्विमींग, त्वायक्वांदो तसेच साधीक मध्ये कब्बड्डी, खो-खो, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धा एकुण ०७ मैदानावर सुरू आहेत   संत नामदेव पोलीस कवायत मैदान, रा. रा. पो. बल गट क.१२ येथील किडा मैदान, नवीन पोलीस वसाहत मैदान, आदर्श कॉलेज किडा मैदान, जिल्हा किडा संकुल, हिंगोली व परभणी येथे खेळवीले जाणार आहेत.
 सदर स्पर्धा यशस्वी करीता जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे विवीध जबाबदारी असलेले २० समित्या स्थापन  करण्यात आल्या  असुन प्रत्येक स्पर्धेकरीता तज्ञ व अनुभवी पंचांची नेमणुक सुध्दा करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेचा समारोप समारंभ दि. २३/०९/२०२२ रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे मा. श्री. निसार तांबोली पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न होणार असुन सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी हिंगोली श्री. जितेंद्र पापळकर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, श्री. संजय दैने, रा.रा.पो.बल गट क्र. १२ हिंगोलीचे समादेशक श्री संदिपसिंह गिल, तसेच नांदेड, परभणी व लातुर येथील पोलीस अधीक्षक व इतर मान्यवर अतिथी उपस्थीत राहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रे, मेडल्स्, ट्रॉफी इत्यादी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
आज रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर व रा. रा. पो. बल गट क. १२ हिंगोलीचे समादेशक श्री संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, जिल्हा किडा अधिकारी श्री संजय मुंढे, पोलीस निरीक्षक श्री सोनाजी आम्ले, श्री बैजनाथ मुंडे, श्री उदय खंडेराय यांचे उपस्थीतीत संत नामदेव पोलीस परेड ग्राऊंडवर भव्य असे अॅडव्हरटाईज बलून हवेत सोडुन व रा. रा. पो. बल गट क. १२ किडी मैदान हिंगोली येथे स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन होवुन सुरूवातील महीला पोलीसांचे कब्बड्डी चे सामने खेळवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे

Post a Comment

أحدث أقدم