हिंगोलीत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या फेस पेंटीग स्पर्धेचा बक्षिसवितरण

 आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या फेस पेंटीग स्पर्धेचा बक्षिस
वितरण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 सप्टेंबर 2022
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, हिंगोली यांच्या वतिने दि. १२.०८.२०२२ ते दि.२६.०८.२०२२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने जिल्हाभरामध्ये विविध कार्यक्रम, स्पर्धा, व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच "हर घर झेंडा आणि HIV/AIDS" या विषयी फेस पेंटिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर यामध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हयातील विविध महाविद्यालयीन युवक व युवती यांनी सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक कु.वर्षा राजू जळते, व्दितीय क्र. कु. बेकटे नेहा परमेश्वर, तृतीय कु. मोहिनी विलास काबंळे तसेच उत्तेजनार्थ कु. श्यामल रोहिदास नरवाडे, कु. सुशिला भालेराव इत्यादीनी क्रमाक मिळवला. विजेत्यास डॉ. राजेंद्र सुर्यवशी जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. प्रकाश कोठूळे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि श्री ज्ञानेश्वर चौधरी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हापर्यवेक्षक, कविता  भालेराव  प्राचार्य यांच्या हस्ते रोख रक्कम प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. डॉ. श्रीराम कन्हाळे शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, प्रा. डॉ. कृष्णा इंगळे बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली, श्री. श्री. ज्ञानेश्वर चौधरी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांनी काम पाहिले.
सर्व प्रथम मान्यावराचे स्वागत करण्यात आले व त्यानतंर श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी एच. आय. व्ही. /एड्स विषयी व आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे तसेच आयोजित स्पर्धे विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री बालाजी चाफाकानडे, समुपदेशक यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वाशीष पाटील, श्री. पवार व श्रीमती दिया कुंदनानी यांनी 
परिश्रम घेतले

Post a Comment

أحدث أقدم