उमरी तालुक्यात फिल्मी स्टाईलने दरोडा ;सतर्क नागरिकांनी एका दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नांदेड , जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथील एका खाजगी पतसंस्थेत फिल्मी स्टाईलने दरोडा घालणाऱ्या टोळीमधील एका दरोडेखोराला पकडण्यात नागरिकांना यश आले. उमरी तालुक्यातील शिंदी येथील कै, व्यंकटराव पाटील कवळे बगर शेती सहकारी पतसंस्थेवर भर दिवसा दरोडा टाकून तीन लाख रुपयांचे लूट करण्यात आली. आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता ही दरोड्याची खळबळ जनक घटना घडली असून या घटनेमुळे सार्वजनिक जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.सिंधी,ता,उमरी,जिल्ह्या,नांदेड येथे कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे भगत शेती सहकारी मर्यादित लिमिटेड ची शाखा आहे. दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटरसायकल वरून सहा दरोडेखोर यांनी पतसंस्थेच्या जागेत मोटरसायकल पार्क करून अचानक पतसंस्थेचे ऑफिसमध्ये जाऊन आपल्या हातातिल तलवारी उभारल्या आणी एका दरोडेखोराने कॅशियरच्या मानेला तलवार लावून तीन लाख रुपये त्यांच्या गल्ल्यातून हिसकावून घेतले आणि ते सहा दरोडेखोर प्रसार होण्याच्या मार्गावर होते तेव्हा पतसंस्थेतील एका कर्मचाऱ्यांनी दगड घेऊन एका दरोडेखोराच्या पाठीमागून डोक्यात घातला तेव्हा तो दरोडेखोर आपल्या मोटरसायकल सह जमीनीवर कोसळला कोसळलेला असता त्या कर्मचाऱ्यांनी आणि पतसंस्थेत ह्यात असलेल्या नागरिकांनी त्या दरोडेखोराला भरपूर चोप दिला मात्र बाकीचे दरोडेखोर प्रसार होण्यास यशस्वी झाले ही घटना उमरी पोलीस स्टेशन यांना समजतात उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी भरपूर जमाव झाला होता. उमरी येथे व्ही पी के समूहाचा गूळ पावडर चा कारखाना आहे, या कारखान्यात शेकडो कर्मचारी काम करतात त्यांचे वेतन व शेतकऱ्यांचे उसाचे लाखोचे बिल या पतसंस्थेमार्फत दिले जाते, ही पतसंस्था उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली चालवली जाते तसेच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नांदेड जिल्ह्यात अशा बऱ्याच संस्था आहेत. तरी पकडलेल्या दरोडेखोरांना नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असता पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे करीत आहेत.
إرسال تعليق