सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर

सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर

हिंगोली (प्रतिनिधी)- 
सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोली या गणेश मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आला आहे. 
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पुरस्कार राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आले आहेत. हिंगोली येथील एनटीसी भागातील सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही गणेश मंडळाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, पाणी वाचवा यावर प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात घेण्यात आले. कबड्डी स्पर्धा, पर्यावरण विषयावर आधारित जनजागृती, सामाजिक सलोखा व मुलगी वाचवा याविषयावर मार्गदर्शन, गौरी गणेश सजावट स्पर्धा, तलवारबाजी प्रात्याक्षिक व चर्चा सत्र, शिक्षकांचा सत्कार, देशभक्तीपर, पाणी वाचवा, मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावा, महाप्रसाद, रक्तदान शिबिर यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते, राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळास जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर केला आहे. दि.१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रागंणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 

Post a Comment

أحدث أقدم