जिल्हा अस्थिरोग विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.भगवान पुंडगे यांची निवड...!
हिंगोली /-
अस्थिरोग संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यासाठी १४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी बैठक घेण्यात आली. यामध्ये अस्थीरोग संघटनेची बैठकीमध्ये डॉ.भगवान पुंडगे यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी डॉ.मंगेश टेहरे व डॉ.अजय शिरडकर हे स्पर्धेमध्ये होते. बैठकीमध्ये डॉ.अमित शहा, डॉ.रमेश मस्के, डॉ.शाहूराज ढाले, डॉ.अजय शिराडकर, डॉ.संदीप इंगळे व सेनगाव येथील डॉ.बगाटे हे उपस्थित होते. बैठकीमध्ये दिवंगत अस्थिरोग तज्ञ डॉ.सुधीर भगत यांना श्रद्धांजली देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.नंदकिशोर करवा व डॉ.सुहास वावडे यांनी काम पाहिले. हिंगोली जिल्हा डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी डॉ.भगवान पुंडगे यांचा अभिनंदन केले. सूत्रसंचलन संघटनेचे सचिव डॉ.मनीष बगडिया यांनी केले तथा आभार डॉ. जयदीप देशमुख यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा