जिल्हा अस्थिरोग विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.भगवान पुंडगे यांची निवड...!



जिल्हा अस्थिरोग विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.भगवान पुंडगे यांची निवड...!

हिंगोली /-
 अस्थिरोग संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यासाठी १४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी बैठक घेण्यात आली. यामध्ये अस्थीरोग संघटनेची बैठकीमध्ये डॉ.भगवान पुंडगे यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

अध्यक्ष पदासाठी डॉ.मंगेश टेहरे व डॉ.अजय शिरडकर हे स्पर्धेमध्ये होते. बैठकीमध्ये डॉ.अमित शहा, डॉ.रमेश मस्के,  डॉ.शाहूराज ढाले, डॉ.अजय शिराडकर, डॉ.संदीप इंगळे व सेनगाव येथील डॉ.बगाटे हे उपस्थित होते. बैठकीमध्ये दिवंगत अस्थिरोग तज्ञ डॉ.सुधीर भगत  यांना श्रद्धांजली देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  डॉ.नंदकिशोर करवा व डॉ.सुहास वावडे यांनी काम पाहिले. हिंगोली जिल्हा डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी डॉ.भगवान पुंडगे यांचा अभिनंदन केले. सूत्रसंचलन संघटनेचे सचिव डॉ.मनीष बगडिया यांनी केले तथा आभार डॉ. जयदीप देशमुख यांनी मानले.


Post a Comment

أحدث أقدم