सामाजिक न्याय विभागाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोलीत
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण हिंगोली, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली व जिल्हा जात पडताळणी समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय विभागाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथमात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण दिपक वडकुते, समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, डॉ.विजय निलावार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, रत्नाकर महाजन, आत्माराम वागतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाज कल्याण विभागाचा आज 90 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांनी प्रास्ताविक केले. तर सुत्र संचालन अशोक इंगोले यांनी केले. तर डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने ( कर्तव्य पथ) सेवा पंधरवाडा या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आणि बार्टीचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق