६० योजनांची माहिती मिळणार एका क्लिकवर
प्रतिनिधी | हिंगोली
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 30 ऑक्टोबर 2022
राज्यात शासकीय कार्यालयांमधून शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांची माहिती मिळण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भाजपच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या पुढाकारातून अॅप विकसित करण्यात आले असून यावर एका क्लिकमध्ये सर्व ६० योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या शिवाय अर्ज भरण्याबाबतही माहिती उपलब्ध होणार असल्याने त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये विहीर, सिंचन, फळबाग, यांत्रिकीकरण, भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना आदी सुमारे ६० योजनांचा समावेश आहे. मात्र या योजनांची गावपातळीवरून शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. याशिवाय शासकीय कार्यालयातूनही त्यांना योग्य माहिती मिळत नसल्याने शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांना पारंपरिक शेती करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सदर बाब
माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
हिंगोली लोकसभा
मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना योजनांची माहिती होऊन त्यांना लाभ घेता यावा. त्यातून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एकरी उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र अॅप विकसित केले आहे. यामध्ये सर्व ६० योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी ९३७३६८८१२५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आला असून त्यासोबत योजनांना क्रमांक देण्यात आले. ज्या क्रमांकाच्या योजनांची माहिती हवी आहे तो क्रमांक व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास त्या योजनेची सविस्तर माहिती योजना काय आहे. योजनेचे निकष, अनुदान, अर्ज कुठे करावा आदी माहिती तातडीने मिळणार आहे. असे भाजपा नेते रामदास पाटील यांनी महाराष्ट्र 24 न्युज ला बोलताना माहिती दिली
إرسال تعليق