पांडुर्णा शिवारात भुंकपाचे धक्के मोठ्या आवाजाने नागरिक भयभीत.

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 4 ऑक्टोंबर 2022

पांडुर्णा शिवारात भुंकपाचे धक्के मोठ्या आवाजाने नागरिक भयभीत.    
  भोकर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात भूकंपाच्या सदृश्य भूगर्भातील आवाजाने नागरिक भयभीत झाले आहेत ही घटना दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता घडली आहे. भोकर तालुक्यातील पांढुर्णा येथे या अगोदर दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. जाणवलेल्या धक्क्यादरम्यान घरातील सामान हादरलेल्या भूगर्भामुळे आणि आवाजामुळे अस्ताव्यस्त पडली दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री 12:45 वाजता भूकंपाच्या धक्क्याने आणि तीव्र आवाजाने घरी हादरली यामुळे गावातील नागरिकांनी घर सोडून बाहेर खुल्या मैदानात येऊन एकमेकास बाहेर निघण्याचे प्रोत्साहन दिले व सर्व जनतेस सुखरूप ठेवून सरपंच यांनी गावातील प्रत्येक नागरिकाला भूकंपाच्या धक्क्यापासून वाचवले. मागील वेळी नांदेडच्या भूवैज्ञानिकांनी भूकंपाच्या स्थळाची पाहणी केली आणि घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले पण दोन दिवसात दोन धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तैनात आहे. पांडुर्णा ,गााठेेवाडी,समदरवाडी,बोरवाडी,जांभळी,. अमरू नाईक तांडा,चितगीरी. आदी गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم