हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला करिता आरक्षीत

हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला करिता आरक्षीत
महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 2 ऑक्टोंबर 2022


राज्यातील २८ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडतीमध्ये सुटले आहे.
राज्यातील जिल्हा २८ परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

ज्यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी सुटले आहे.
वीस पैकी साडेबारा वर्षे राहिले महिलाराज

हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून २० वर्षांच्या कालखंडात साडेबारा वर्षे जिल्हा परिषदेवर महिलाराज राहिले आहे. पहिल्या अध्यक्षा सुलोचना काळे ह्या होत्या. त्यावेळी हे पद अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव होते. त्यावेळी राखीव वर्गातून निवडून आलेल्या दोन्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. यामुळे बहुमत नसतानाही पहिले अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले होते. नंतरच्या अडीच वर्षात काँग्रेसच्या स्व. सरोजनीताई खाडे अध्यक्ष झाल्या. तिसऱ्या जिल्हा परिषदेत वसमत तालुक्यातील लक्ष्मीबाई बळवंते या ओबीसी महिला प्रवर्गातून तर कळमनुरी तालुक्यातील मिनाक्षी बोंढारे खुल्या प्रवर्गातून अध्यक्ष झाल्या. ह्या दोन्ही महिला अध्यक्षा शिवसेनेच्या होत्या. त्यानंतर मावळत्या जिल्हा परिषदेत नंतरच्या अडीच वर्षात कळमनुरी तालुक्यातील शिवसेनेच्या शिवाणी नरवाडे अध्यक्ष होत्या. २० वर्षांत साडेबारा वर्ष महिलांना संधी मिळाल्यानंतर पुढील काळासाठी सर्वसाधारण महिलासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पद आरक्षीत करण्यात आले आहे.
आहे मात्र महिलांचे आरक्षण फक्त नावालाच आहे
कारभारी घेतात खुर्चीचा फायदा 

Post a Comment

أحدث أقدم