देशातील अरबपतीचे कर्ज दोन मिनिटात माफःपण शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क15 नोव्हेंबर 2022
हिंगोली- केंद्रशासनाकडून अनेक धोरणामध्ये बदल करण्यात येत आहे. एकीकडे अरबपती व्यक्तींचे दोन मिनिटात कर्ज माफ केले जाते; परंतु देशातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांची कर्जमाफी केली जात नसल्याने खा. राहुल गांधी यांनी माळहिवरा पाटीवर कॉर्नर समेमध्ये केंद्रशासनाच्या या चुकीच्या धोरणावर कडाडून हल्ला चढविला.
१४ नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरातून भारत जोडो पदयात्रा पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाल्यानंतर वडद येथे ही पदयात्रा मुक्कामी होती. त्यापूर्वी माळहिवरा पाटीवर कॉर्नर
कॉर्नर सभेत खा. राहुल गांधी यांचा केंद्रशासनावर कडाडून हल्ला
सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजीमंत्री माणिकराव ठाकरे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी सभापती उत्तमराव आसोले बाजीराव पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी आ. गोरेगावकरांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या पद यात्रेबद्दलं मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी बोलतांना केंद्रशासन कुचकामी ठरत असून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. या उलट मात्र अरबपतीच्या विशेष बाबीकडे त्यांचे लक्ष
अधिक दिले जात आहे. आंतर राष्ट्रीय बाजारात डिझेल, पेट्रोलचे दर काही असले तरी भारतात मात्र चढ्या दरात विक्री केली जात आहे. युपीएच्या काळात ४०० रूपये दराने सिलेंडर दिले जात असताना आज १ हजार ते १२०० रूपये दराने सिलेंडर विक्री केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ सभामधून भाईयो और बहिणोओ असे वाक्य वापरून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे हे केंद्रशासन कुचकामी असल्याचा आरोप खा. गांधींनी केला. सभेला मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
إرسال تعليق