हिंगोली शहरात ०५ लाख ६९ हजार ३६० रुपयांचा गुटखा जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची कार्यवाही
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 16 नोव्हेंबर 2022
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैद्य धंदे विरुध्द विशेष मोहीम राबविण्यात येत असुन दिनांक १५/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहीती मिळाली कि, प्रॉपर हिंगोली शहरातील कटके गल्ली, पेन्शनपुरा भागात युनुस खाँ जब्बार खॉ पठाण याचे राहते घराचे वरील रिकाम्या खोलीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व पान मसाला तंबाखु विक्री करणेकामी साठवलेला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पो. नि. श्री उदय खंडेराय, व स्था. गु. शा. पथकातील पोलीस स्टॉफ यांनी मिळुन कटके गल्ली, पेन्शनपुरा भागात युनुस खॉ जब्बार खॉ पठाण याचे राहते घरी दोन पंचासमक्ष छापा मारला असता इसम नामे युनुस खॉ जब्बार खॉ पठाण, वय ५५ वर्ष, रा. कटके गल्ली, पेन्शनपुरा, हिंगोली याचे राहते घरातुन व्हि 9 तंबाखु, बाबा- १२०, बाबा- १६०, पान पराग, रत्ना सुगंधीत तंबाखुचे पोते व बॉक्स मिळून आले. सदरचा गुटखा बाबत यूनुस खॉ जब्बार खॉ पठाण यांना विचारपुस केली असता सदरचा गुटखा हा त्याचा भाऊ वसीम खाँ जब्बार खॉ पठाण याने चोरटया मार्गाने विक्री करण्यासाठी साठवणूक करण्यात आला असल्याचे सांगीतले. सदरचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला व्हि १ तंबाखु, बाबा १२०, बाबा- १६०, पान पराग, रत्ना सुगंधीत तंबाखु पानमसाला / गुटख्याचा एकुण किंमती ५,६९, ३६०/ रु. किंमतीचा मिळून आल्याने सदर दोन्ही आरोपीविरुद्ध पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक हिंगोली जी . श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, सपोनि. श्री सुनिल गोपीनवार, पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, गजानन पोकळे, शेख शकील, नितीन गोरे, राजुसिंग ठाकुर, किशोर सावंत, विशाल खंडागळे, रविना घुमनर व स्था.गु.शा. चे पथकाने केली आहे.
إرسال تعليق