आठवड्यातून चार दिवस 'कोंबींग ऑपरेशनगुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचा प्रयत्न

आठवड्यातून चार दिवस 'कोंबींग ऑपरेशन

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचा प्रयत्न

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 6 नोव्हेंबर 2022

हिंगोली ■ जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नुतन पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या आदेशान्वये आठवड्यातून चार दिवस विशेष मोहिमेद्वारे कोंबींग ऑपरेशन राबविले जाणार आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई सुरू असताना सराईत व रोकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही बाबत विशेष मोहिम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची नियमित तपासणी व कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे उपविभागीय पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आठवड्यातून चार दिवस गुन्हेगारी वस्ती, संवेदनशिल ठिकाणी तसेच सराईत
गुन्हेगारामार्फत विशेष कोंबींग ऑपरेशन राबवून कारवाई केली जाणार आहे. या अनुषंगाने ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हिंगोली ग्रामीण उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या नेतृत्वात खरबीसह परिसरात कोंबींग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. ज्यामध्ये तुळशीराम तान्या चव्हाण रा. इंचा, लक्ष्मण माणिक पवार, खेतऱ्या माणिक पवार, पांडुरंग मच्छल्या पवार, मंगल भुराजी काळे रा. खरबी, परमेश्वर पवार हे आरोपी

न्यायालयाकडुन समन्स व वारंट निघुनही न्यायालयात हजर राहत नसल्याने या सहा जणांना अटक वारंट तामीळ करून न्यायालयात हजर करण्यात आले. कोंबींग ऑपरेशनच्या मोहिमेत उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण मळघने, रणजीत भोईटे, पोलिस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, कांबळे, केंद्रे यांच्यासह हिंगोली ग्रामीण, नर्सी नामदेव व गोरेगाव ठाण्यातील २० अंमलदारांनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

أحدث أقدم