भगवान परशुराम रथयात्रेचे हिंगोलीत स्वागत...!



भगवान परशुराम रथयात्रेचे हिंगोलीत स्वागत...!

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 18 नोव्हेंबर 2022
हिंगोली 
विप्र फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी निघालेल्या भगवान परशुराम रथयात्रा आज शुक्रवारी हिंगोली शहरात दाखल होताच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. 
अरुणाचल प्रदेश मधील लोहीत जिल्ह्यातील परशुराम कुंड तीर्थक्षेत्र येथे भगवान परशुराम यांची पंचधातूयुक्त ५१ फुटांची उंच मूर्ती निर्माण करण्याचे दायित्व केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विप्र फाउंडेशन राष्ट्रीय संघटन कोलकत्ता यांना सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशातील सकल ब्राह्मण समाजाला जोडण्याकरिता फाउंडेशनच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली आहे. सदर रथयात्रा आज शुक्रवारी दुपारी पाच वाजता नांदेड नाका येथून शहरात दाखल झाली. यावेळी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने रथयात्रेचे भव्य  स्वागत करण्यात आले. हिंगोली विधानसभेचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, मा. नगराध्यक्ष बाबाराव बांगर  आदींची उपस्थिती होती. त्यानंतर ही रथयात्रा इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जवाहर रोड मार्गे गायत्री भवन येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी महाआरतीने समारोप करण्यात आला. सदर रथयात्रा हिंगोली येथून वाशिमकडे रवाना झाली. रथयात्रेमध्ये सकल ब्राह्मण समाजातील महिला पुरुष व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रथयात्रेमध्ये ढोल पथकासह भजनी मंडळाने सहभाग नोंदविला.


Post a Comment

أحدث أقدم