रेल्वे आंदोलनाला सर्वच स्तरातून प्रतिसाद
२३ नोव्हेंबर रोजी दिसणार जनआक्रोश
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 नोव्हेंबर 2022
हिंगोली- जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्पेâ २३ नोव्हेंबर रोजी आयोजित आंदोलनाला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्यक्ष आंदोलनाच्या दिवशी प्रशासनाला मोठ्या जन आक्रोशाला सामोरे जावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
रेल्वे रुंदीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊनही लांबपल्याच्या फारशा रेल्वेगाड्या या मार्गावर सुरू झाल्याच नाहीत. कोरोनाच्या काळात बंद झालेल्या गाड्याही पूर्णपणे सुरू करण्यात आल्या नाहीत. या मार्गावरून मुंबईकरिता रेल्वे असावी ही हिंगोलीकरांची मागणी प्रारंभीपासून होती. यामुळे अजनी-कुर्ला ही रेल्वे सुरू करण्यात आली; परंतु ही रेल्वे सुविधा असून अडचण नसून खोळंबा अशीच होती. अशा परिस्थितीत मागील महिन्यात जालना येथून बिहार राज्यातील छपरा शहरासाठी एक तात्पुरती रेल्वे सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. ही रेल्वे परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे जाणार अशी चर्चा होती. असे असताना अचानक ही रेल्वे जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे सुरू करण्यात आली. यामुळे मराठवाड्यासहीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा जनआक्रोश उफाळुन आला. ७ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती तर्पेâ एक महामोर्चा काढुन शासनाला १५ दिवसाचा अवधी देण्यात आला. या कालावधीत जालना - छपरा रेल्वे पूर्णा, अकोला मार्गाने सुरू न झाल्यास २३ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्हा बंद व हिंगोली आणि वसमत स्थानकावर रेल्वे रोको करण्याचा इशारा समितीतर्पेâ देण्यात आला होता. याबाबत संघर्ष समितीला प्रशासनाकडुन काहीच उत्तर न मिळाल्यामुळे मागील तीन दिवसापासून जिल्हाभर जनजागृतीचे कार्य सुरू झाले आहे. वसमत येथे सरस्वती मंदिरात झालेल्या व्यापारी व पत्रकारांच्या बैठकीत वसमतकरांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या. वसमत रेल्वे स्थानकावर अनेक लांबपल्याच्या गाड्या न थांबता निघुन जात असल्यामुळे मोठी नाराजी आहे. शिवाय वसमत रेल्वे स्थानकातील फलाट क्र. २ प्रवाशांसाठी असूनही त्याचा वापर मालधक्का म्हणून होत असल्याने वसमतकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे अनेक मुद्दे बैठकीत मांडुन वसमत येथील व्यापारी व पत्रकारांनी संघर्ष समितीच्या आंदोलनाला एकमुखी पाठींबा जाहिर केला. २३ नोव्हेंबर रोजी वसमत रेल्वे स्थानकावर देखील रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे वसमत व्यापारी संघटनेतर्पेâ जाहिर करण्यात आले.
या सोबतच सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, आखाडा बाळापूर, कनेरगाव नाका व गोरेगाव येथील व्यापार्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचे स्वंयस्फुर्तपणे समितीला कळविले आहे. २३ नोव्हेंबर रोजी हिंगोली व वसमत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको केले जाणार असून जिल्हाभरातील सर्व व्यापारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असला तरी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलनकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
--------------------------------------------------------------------------
आंदोलनाकडे पाठ फिरवून रेल्वे प्रशासन लागले अकोला-अकोट शटलच्या उद्घाटनाच्या तयारीला
ज्या दिवशी हिंगोली व वसमत येथे रेल्वे विभागाच्या विरोधात आंदोलन होणार आहे, त्याच दिवशी अकोला- अकोट दरम्यान रेल्वे शटल सेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन केले जाणार आहे. पंधरवाड्यापूर्वी रेल्वे संघर्ष समितीने दिलेल्या आंदोलनाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्यामुळे जनतेत मात्र मोठी नाराजी आहे.
टिप्पणी पोस्ट करा