रेल्वे संघर्ष समितीच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
२३ नोव्हेंबर रोजी करणार जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलन
हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या पहिल्या टप्यातील आंदोलनाला व्यापारी, पत्रकार विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरीक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रेल्वेविषयक प्रश्नावर असलेली तीव्रता दर्शविली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने निवेदन पाठविले असून हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी सदरचे निवेदन स्विकारले. या प्रश्नावर असलेला जनआक्रोश रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ असे परदेशी यांनी सांगितले. सदर निवेदनात नुकतीच हिंगोली मार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा-अकोला या रेल्वे मार्गावरून चालू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अकोला-पूर्णा या मार्गावरून मुंबईला जाणारी रेल्वे गाडी चालू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील व्यापार पेठेकरीता अत्यावश्यक असलेले गुड्सशेड तत्काळ उभारण्यात यावे, या मार्गावरील बंद असलेल्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
७ नोव्हेंबर सोमवार रोजी संघर्ष समितीने ११.३० वाजता गांधी चौकात जमण्याची विनंती केली असतांना आंदोलनकर्ते मात्र १०.३० पासूनच जमायला लागले होते. १२ वाजण्याच्या सुमारास उत्स्फूर्तपणे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार व व्यापारी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या पहिल्या टप्यात सामील झाले. यावेळी युवकांमध्ये असलेला आक्रोश मोठ्या प्रमाणावर दिसून आला. जालना-छपरा रेल्वे हिंगोली मार्गे धावलीच पाहिजे, हिंगोली-मुंबई रेल्वे मिळालीच पाहिजे, लडेंगे-जीतेंगे अशा घोषणांनी अवघी बाजारपेठ दुमदुमली होती. एका रॅलीच्या स्वरूपात गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वे संघर्ष समितीचे बॅनर हातात घेऊन हा मार्च काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीचे माजी आ.गजानन घुगे, नंदकिशार तोष्णीवाल, विनायक भिसे, दिलीप चव्हाण,गोवर्धन अन्ना विरकुंवर, बंसतकुमार भट्ट, शेख नईम शेख लाल, शेख खलील बेलदार, अजित मगर, पंकज अग्रवाल, अॅड.आर. एन. अग्रवाल, अॅड.अनिल तोष्णीवाल, रविंद्र वाढे, अनिल नेनवाणी,सुरेशअप्पा सराफ, प्रा.पंढरीनाथ घुगे, माबुद बागवान, सुमेध मुळे, प्रमोद मुंदडा, मिलींद उबाळे, डॉ.विजय निलावार, बिरजु यादव, जेठानंद नेनवाणी, रविंद्र पारसमल सोनी, विनोद बांगर,कृष्णा अग्रवाल, सुभाष लदनिया, विश्वास नायक, नरबदप्रसाद अग्रवाल, वैâलास शहाणे, नजिब खॉ पठाण, राजेश अग्रवाल, सुदर्शन कंदी, सुरज व्यास, ज्योतीपाल रणवीर, अ.हकीम बागवान, अ.सत्तार बागवान, चेतन अग्रवाल, अशोक चांडक, राधेशाम वाघमारे, अॅड.आर.एन.बांगर, शेख शहानवाज शेख हुसैन, स्वतंत्र भट्ट, सचिन भट्ट, प्रविण भट्ट, अॅड.मोहसीन खान पठाण, मुजीब पठाण, अश्विन भट्ट, नामदेव मार्वेâ, अक्षय डाखोरे, संतोष सावळे, शेख शकील, सतिश लोणकर, आमेर बागवान, उबेद अली खान, अदनाथ शेख, अफरोज शेख, सय्यद गौस, कलीम खान, साद अहेमद, शेख अवेस, साजीद पठाण, शेख बासिद, रऊफ खान पठाण, साजीद लाला, के.पी.विडोळकर, राजेंद्र हलवाई, शेख जमील बागवान, प्रद्मून गिरीकर, जमीर खाँ आदींसह अनेक नागरीक सहभागी होते.
إرسال تعليق