गोरगरिबांच्या योजना महिला पर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार हिंगोलीत चित्रा वाघ यांचे प्रतिपादन



गोरगरिबांच्या योजना महिला पर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार हिंगोलीत 
 चित्रा वाघ यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 19 नोव्हेंबर 2022

हिंगोली -
 केंद्र व राज्य सरकारच्या अनेक शासकीय  योजना असून त्या योजना बचत गटांच्या  माध्यमातून गोरगरीब महिला पर्यंत पोहचवन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता.१९)  पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  आमदार  तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकूते, महिला जिल्हाध्यक्षा उज्वलाताई तांभाळे आदींची उपस्थिती होती. वाघ पुढे म्हणाल्या, राज्यातील महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विदर्भातील सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ यांचे दर्शन घेऊन हा दौरा सुरू केला आहे. आतपर्यंत विदर्भातील अकरा जिल्हे ,पूर्ण करून शुक्रवार पासून मराठवाड्यात हा दौरा सुरू केला काल नांदेड येथे महिला विकास मेळावा आटोपून आज शनिवारी हिंगोली येथील भाजप महिला विकास मेळाव्यात मार्गदर्शन केले. यात  महिलांच्या समस्या, अडीअडचणी , बचत गटाच्या महिलांनी उत्पादन केलेल्या मालाला मार्केट देणे यासाठी येत्या काळात बचत गटातील महिलाना राज्यात शिंदे, फडणवीस सरकार ओपन मार्केट सुरू करणार असल्याचे वाघ यांनी स्पस्ट केले.

मागील अडीच वर्षाच्या काळात महिलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी दिल्लीच्या निर्भयाची आठवण झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्र्यांनी भाजप शाशीत प्रदेशातील गुन्हेगारीच्या आकडेवारीचा पाढा वाचला, हे मात्र खरे आहे यासाठीच  शिंदे व फडणवीस सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पहिले काम करणार यासाठी प्रशाशकिय यंत्रणेला आम्ही सोबत घेऊन प्रश्न सोडविणार. हा लढा केवळ महिलांवरील अत्याचारासाठीच मोठ्या महिलांच्या ताकदीवर उभा केला आहे. महिला बचत गटांना शासकीय निधी उपलब्ध करून  महिलांचे हात बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महिला व युवतीसाठी प्रशिक्षण देण्याचे काम ,महिलांवर अत्याचार होत असतील तर  दोन हात करण्याचे काम आम्ही करणार असल्याचे सांगून राज्यात लव्ह जिहाद सारख्या घटना घडत असल्याने आता उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महिलांसाठी महाराष्ट्रात हा कायदा आणण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध  असल्याचे त्यांनी संगीतले. राज्यभरातील महिलांवरील अत्याचार झालेल्या अनेक घटनाचा उदाहरणांसह वाघ यांनी दाखला दिला .


राज्यात महिलांवर अश्या लव्ह जिहाद सारख्या  घटना घडत असतील तर आम्ही आरोपीची गय केली जाणार नाही. हे काम करण्यासाठी राज्यभरातील महिला मला साथ देतील. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेत जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटने संदर्भात चर्चा केली.

● भरारी वृत्त सेवा हिंगोली ●

Post a Comment

أحدث أقدم