स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले, गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले, 
 गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
28 मार्च2023

.      हिंगोली स्थानिक  गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीतील भगवती परिसरामध्ये रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्यास संदर्भाने सदर ठिकाणी छापा मारून रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक सुभाष शिंदे राहणार जुमडा तालुका वाशिम यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉली  किमती सहा लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव परिसरातील अवैध रेती तस्करांचे 
धाबे दणाणले
 बेधडक  कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली 
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार संभाजी लेकुळे,गजानन पोकळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, खांडेकर यांच्या पथकाने कारवाई केल्याने गोरेगाव परिसरातील अवैध वाळू वाहतूक रेती तस्करांचे धाबे दणाणले

Post a Comment

أحدث أقدم